छावा चित्रपट सुरू असताना युवकाने पडदा फाडला
पोलिसांनी ताब्यात घेत केला गुन्हा दाखल
भरूच, गुजरात : महाराष्ट्रासह देशभरामध्ये सध्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मोठी पसंती मिळविली आहे. सगळेच शो हाऊसफुल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरात राज्यातल्या भरूच मध्ये एका सिनेमागृहात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा या चित्रपटाचा शो सुरू होता.
रविवारी रात्री नऊ ते बाराच्या या शोच्या वेळी अचानक एका युवकाने ओरडा ओरडा सुरू केला. तो पडद्याच्या दिशेने चालत गेला. त्याने जवळच असलेले अग्निशमन यंत्र काढून ते स्क्रीनिंग सुरू असणाऱ्या पडद्यावर फेकले. यामुळे पडद्याचे नुकसान होत तो फाटला. युवक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पडद्याजवळ जात हाताने पडदा फाडायला सुरुवात केली.
अचानक झालेल्या या घटनेमुळे चित्रपटगृहामध्ये एकच गोंधळ उडाला. प्रेक्षक त्याला ओरडू लागले. रोखण्याचा प्रयत्न करू लागले. पण तो युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने प्रेक्षकांनाच शिव्यांची लाखोळी व्हायला सुरुवात केली.
त्यानंतर काही प्रेक्षकांनी टॉकीजच्या कर्मचाऱ्यांना बोलविले. त्यांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांना देखील पाचरण केले. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युवकाला ताबा घेतले. दरम्यान, टॉकीज व्यवस्थापनाने प्रेक्षकांना उर्वरित सिनेमा पाहण्यासाठी लगतच्या दुसऱ्या स्क्रीनवर व्यवस्था केली. त्यामुळे प्रेक्षकांचा रोष देखील आटोक्यात आला.
आरोपीकडून महिला प्रेक्षकाला मारहाण
हा प्रसंग घडल्यानंतर एक महिला पुढे येत म्हणाली की, आता आम्हाला सिनेमा पाहायचा नाही. आमचे पैसे परत करा. हे ऐकल्यानंतर त्या युवकाने सदर माहिती वाद घालण्यास सुरुवात केली. तो संतापला. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने महिलेला बेल्ट, लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
तो दारूच्या नशेत
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सदर युवकाचे नाव जयेश वासवा असून तो भरुच येथील राहणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. जयेश हा आई-वडिलां समवेत राहतो. तर उदरनिर्वासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचे चित्रपटामध्ये दाखविले जात असताना ते पाहिल्याने आपण अस्वस्थ झाल्यामुळे सदर कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
0 Comments