Subscribe Us

Header Ads

यंगिस्तान : अपक्ष आमदार सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचे विक्रम राठोड उतरले मैदानात, म्हणाले आम्ही तांबें सोबत

 

अहिल्यानगर : बाजारात अनेक प्रकारची शीतपेय आहेत. तरुणांमध्ये ती लोकप्रिय आहेत. मात्र अलीकडील काळामध्ये बाजारात मिळणाऱ्या एनर्जी ड्रिंक कडे तरुणांचा कल वाढताना पाहायला मिळत आहे. यामुळे आरोग्याचे अनेक धोके निर्माण होत आहेत. 

नेमका याच मुद्द्याला आ. सत्यजित तांबे यांनी हात घालत सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये सभागृहात सरकारचे लक्ष वेधले आहे. लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या स्टिंग या एनर्जी ड्रिंक वर बंदी घालण्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. त्यांच्या या मागणी नंतर युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड हे देखील त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. तांबे यांच्या मागणीला पाठिंबा देत या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या समवेत असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. 

विधान परिषदेत बोलताना आ.तांबे म्हणाले की, पेप्सीको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवल आहे. त्याचं नाव आहे स्टिंग. त्याची जाहिरात जी झाली आहे त्यामध्ये एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर त्याचा हिरो पंधरा मजले पळत पळत चढतो, असं दाखवलं आहे. या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले. एक एनर्जी ड्रिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेड बुल नावाच आहे. ते खूप प्रसिद्ध आहे. त्याची किंमत शंभर रुपये आहे. तर लोकल मार्केटमध्ये तयार होणारे एनर्जी ड्रिंक हे 40, 50, 60 रुपयांमध्ये मिळतात. शाळा, कॉलेज यांच्या आसपास ते सर्रासपणे उपलब्ध आहेत. आपण (मंत्री महोदयांनी) उत्तरामध्ये म्हटलं आहे की, शाळा, कॉलेजेसच्या परिसरामध्ये ते नाहीत. माझा प्रश्न हा आहे की, हे ड्रिंक शाळा, कॉलेजेच्या परिसरात नाहीत हे उत्तर देण्या आधी कोणत्या पद्धतीची कार्यवाही, किती तपासण्या, काय तपासण्या मागच्या एका वर्षामध्ये केल्या ? किती ठिकाणी छापे टाकेल ?, याचे उत्तर मंत्री महोदय आपण दिल पाहिजे. 

यानंतर तांबे यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांद्वारे राठोड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राठोड यांनी त्यात म्हटले आहे की, "स्टिंग" ड्रिंकवर बंदीच्या मोहीमेला शिवसेना युवा सेनेचा पाठिंबा आहे. मी आ. तांबे यांच्या "स्टिंग ड्रिंक बंदी" या जनहिताच्या मोहिमेस पूर्ण पाठिंबा देतो. या मोहिमेच्या माध्यमातून लहान मुले, युवक व त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य वाचवण्याचा एक मोठा समाजोपयोगी प्रयत्न होत आहे. 

शिवसेना युवा सेनेच्या वतीने जनजागृती अभियान राबवून हे अपायकारक पेय बंद होण्यासाठी शासनाकडे ठोस मागणी करण्यात येईल. ही लढाई प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आहे. आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हायला हवे, असे राठोड यांनी म्हटले आहे. 


Post a Comment

0 Comments