Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग : अज्जू खान म्हणतो, "मै तो बोलूंगा संग्रामभैय्या काईच काम करो.. आज बाजार के अंदर उनके वजेसे ही धंदे लग रहे है....



अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळेंनी केला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या मध्यवर्ती कापड बाजार, एमजी रोड परिसरामध्ये अतिक्रमणांच्या विषयांवरून गेल्या अनेक दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. त्यातच एका हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीवर अज्जू खान नामक इसमाने हल्ला केला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. 

त्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी जगताप यांना भवानीनगरचा मौलवी असे नाव न घेता संबोधत खान हा आमदारांच्याच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे म्हणत त्यांचे एकत्र फोटो समाज माध्यम, प्रसार माध्यमांवर व्हायरल केले होते. 

यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष आमने-सामने आले आहेत. यावरून सुरू असणारी आरोपांची मालिका काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच शहरप्रमुख किरण काळे यांनी पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 


काळे यांनी व्हायरल केलेला वडिओमध्ये अज्जू खान म्हणतो, "मै तो बोलूंगा संग्रामभैय्या काईच काम करो.. आज बाजार के अंदर उनके वजेसे ही धंदे लग रहे है..

किरण काळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये  म्हटले आहे की, 

बेगडी हिंदुत्ववादी आमदाराची पोलखोल करणारा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दूध का दूध, पाणी का पाणी समोर आहे. अहिल्यानगर मधील तमाम हिंदूंनी झुल पांघरलेल्या लांडग्यापासून सावध राहावे. आपल्या हिंदू आया बहिणींवर हल्ला करून मारहाण करणारा हा नराधम तथाकथित स्वयंघोषित धर्मरक्षक आमदाराचाच सोडलेला पाळीव पंटर आहे. गंगाधर ही शक्तिमान है, असे म्हणत थेट आ. जगताप यांची सदर व्हिडिओच्या माध्यमातून पोलखोल केल्याचा दावा केला आहे. 

या व्हिडिओमुळे गंगाधर कोण ? शक्तिमान कोण ?गंगाधर हाच खरा शक्तीमान आहे का ? यावरून अहिल्यानगर शहरामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. 

काळे यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ 



Post a Comment

0 Comments