अहिल्यानगर, दि. २६ जुलै : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी नागरिकांसाठी मोफत व सवलतीच्या दरात रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर महानगर प्रमुख किरण काळे यांनी नागरिकांना या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले, या शिबिरासाठी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड (मेट्रोपोलिस लॅब) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. या शिबिराचे आयोजन सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मेट्रोपोलिस लॅब, भिस्तबाग चौक, प्लॅनेट फार्मा शेजारी, ज्ञानेश्वर ड्रायव्हिंग स्कूल समोर, सावेडी, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात थायरॉईड (TSH) किंवा कोलेस्टेरॉल यापैकी कोणतीही एक रक्त चाचणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. तसेच शुगर (F&PP) तपासणी केवळ ₹४९ आणि बॉडी व्हायटल पॅकेज केवळ ₹१०० या विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय इतर विविध रक्त चाचण्यांवर ५० ते ६५ टक्क्यांची भरघोस सवलत देण्यात आली आहे. सर्व चाचण्यांचे अचूक निकाल मिळण्यासाठी नागरिकांनी ८ ते १० तास उपवास करूनच रक्ताचा नमुना द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पूर्व नाव नोंदणी आवश्यक :
शिबिरात सहभागी होण्यासाठी येण्यापूर्वी व्हॉट्सअपद्वारे पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून, ९०६७९ ९९९०२ या क्रमांकावर इच्छुकांनी संपूर्ण नाव, जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक पाठवून नोंदणी करावी. नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन किरण काळे यांनी केले आहे.
ठाकरे शिवसेना हा पक्ष हा नेहमीच समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य देत आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांसह, नातेवाईकांसह व मित्रपरिवारासह या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी," असे आवाहन किरण काळे यांनी केले.





0 Comments