Subscribe Us

Header Ads

छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेत भिंगार हायस्कूल, आठरे पाटील स्कूल, फिरोदिया हायस्कूलने मारली बाजी

 

मुली अव्वल, मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दूला देखील पारितोषिके 

विजेत्या ५० स्पर्धकांची नावे जाहीर 

प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ५२२७ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला आहे. २२ शाळांचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. शिवसेनेने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ५० विजेत्यांची पारितोषिके जाहीर केली आहेत.

यामध्ये भिंगार हायस्कूलचे ९, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे ५, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या ५ विद्यार्थ्यांनी सर्वाधिक बक्षिसे पटकावत बाजी मारली आहे. मुलींचा टक्का अव्वल राहिला असून ५० पारितोषिकां पैकी ३७ मुलींनी तर मुलांनी १३ पारितोषिके मिळवली आहेत. स्पर्धेचा निकाल शिक्षक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अंबादास शिंदे सर, स्पर्धा समन्वयक किशोर कोतकर, स्पर्धा सहसमन्वयक रोहिदास साळवे सर यांनी जाहीर केला आहे. 

छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये पार पडलेली आजवरची ही सर्वात भव्य स्पर्धा असल्याचे शहर शिवसेनेने म्हटले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चार भाषांमधून इयत्ता ५ वी ते ९ वीच्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे उर्दू भाषेला ५ पारितोषिके मिळाली असून यामध्ये चांद सुलताना हायस्कूल (२ पारितोषिके), मौलाना आझाद गर्ल्स हायस्कूल (२ पारितोषिके), अ.नगर यतिमखाना (१ पारितोषिक) यांच्या विद्यार्थ्यांनी बक्षीसे पटकवली आहेत. यासह किशोर प्रशाला, विश्रामबाग शाळा, रेसिडेन्सील हायस्कूल, रूपीबाई बोरा, अशोकभाऊ फिरोदिया स्कूल, सेंट मायकल स्कूल, राजेंद्र स्वामी विद्यालय, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, स्नेहालय परीस शैक्षणिक प्रकल्प, काकासाहेब म्हस्के विद्यालय, करंदीकर हायस्कूल, देवेंद्रनाथ माध्यमिक विद्यालय, चव्हाण प्रशाला, सनफार्मा स्कूल, यशवंत माध्यमिक विद्यालय या शाळांच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळविले आहे.

विजेत्या स्पर्धकां साठीचा पारितोषिक वितरण समारंभ मे महिन्यामध्ये पार पडणार आहे. तर स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल ५१७७ विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र शहर शिवसेनेच्या वतीने दिले जाणार आहे. सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे शहर प्रमुख किरण काळे यांनी शिवसेनेच्या वतीने अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी अंबादास शिंदे, किशोर कोतकर, रोहिदास साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

निकाल पुढील प्रमाणे 

इयत्ता ५ वी : प्रथम - आरुष महारुद्र चिकणे (आठरे पाटील स्कूल), द्वितीय - श्रेया राजू केरुलकर (यशवंत विद्यालय), तृतीय -अवधूत किशोर क्षीरसागर (किशोर प्रशाला), चौथे - रुद्र निखिल धस (किशोर प्रशाला), पाचवे - अंजली प्रवीण ढमाले (भिंगार हायस्कूल), उत्तेजनार्थ (५ बक्षीसे) - अदिती सुनील कानडे (विश्रामबाग), श्रेया रावजी कासार (आठरे पाटील स्कूल), फातिमा परवेज शेख (आठरे पाटील स्कूल), फरहान फिरोज शेख (यशवंत विद्यालय), ईशान प्रकाश किवडे (भिंगार हायस्कूल), 

इयत्ता ६ वी : प्रथम - श्रावणी अनिकेत बडे (भिंगार हायस्कूल), द्वितीय - मानसी अंबादास वल्लाकट्टी (किशोर प्रशाला), तृतीय - सार्थक देवदान धाडगे (रेसिडेन्शिअल हायस्कूल), चौथे - अवनी निलेश पराते (भिंगार हायस्कूल), पाचवे - श्रेयस अतुल रासकर (रुपीबाई बोरा शाळा), उत्तेजनार्थ (५ बक्षीसे) - आनंदी योगेश केदारे (अशोकभाऊ फिरोदिया स्कूल), शिवराज दीपक पवार (सेंट मायकल स्कूल), रितिका राहुल काळे (राघवेंद्र स्वामी विद्यालय), यज्ञ सुरेश आरे (भिंगार हायस्कूल), हूरैन इरफान शेख (मौलाना आझाद गर्ल्स हायस्कूल)

इयत्ता ७ वी : प्रथम - ग्रीष्मा संदीप माळगे (भिंगार हायस्कूल), द्वितीय - अक्षदा विजय मैड (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), तृतीय - श्रेयस संदीप हिंगडे (आठरे पाटील स्कूल), चौथे - सिद्धीका सतीश म्हस्के (भा. फिरोदिया हायस्कूल), पाचवे - तनिष्का राजू केरूळकर (यशवंत विद्यालय), उत्तेजनार्थ (५ बक्षीसे) - विभावरी श्याम शिंदे (भा. फि. हायस्कूल), रीदा फैरोज सय्यद (चांद सुलताना हायस्कूल), ओवी सोमनाथ गायकवाड (विश्रामबाग), राधा अमोल कापसे (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल), श्रावणी संतोष सुरुंगकर (रूपाबाई बोरा स्कूल)

इयत्ता ८ वी : प्रथम - रोशनी विजय थोरात (भिंगार हायस्कूल), द्वितीय - स्वप्नाली अजिनाथ चौधरी (भिंगार हायस्कूल), तृतीय - काशीद अनिस शेख (चांद सुलताना हायस्कूल), चौथे - साक्षी संदीप शिंदे (भा. फि. हायस्कूल), पाचवे - मयुरी गणेश घोगरे (न्यू इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ (५ बक्षीसे) - रिधिमा अनिल पाथरे (स्नेहालय परीस बालभवन), श्रुती संतोष कोकाटे (काकासाहेब मस्के मा.विद्य.), अनुष्का सोमनाथ चौधरी (भा. फि. हायस्कूल), योगिता मोहन राठोड (करंदीकर हायस्कूल), निर्मिती प्रकाश दुल्लम (आठरे पाटील स्कूल)

इयत्ता ९ वी : प्रथम - रिया संतोष चिनके (भिंगार हायस्कूल), द्वितीय - वैष्णवी संदीप बेरड (देवेंद्रनाथ माध्य. विद्या.), तृतीय - पुष्पा विलास लांडगे (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल), चौथे - मय्यम सरफराज शेख ( मौ.आझाद उर्दू स्कूल), पाचवे - कौसर अशोक शेख (अ.नगर यतिमखाना), उत्तेजनार्थ (५ बक्षीसे) - युवराज अनिल भापकर (चव्हाण विद्यालय), अनुष्का सुधीर बैरागी (आठरे पाटील स्कूल), श्रुती बद्रीनाथ धस (चव्हाण विद्यालय), सुहास मच्छिंद्र बळे (सनफार्मा विद्यालय), वैष्णवी अंकुश ढुमणे (भा. फि. हायस्कूल).

Post a Comment

0 Comments